कल्याण : मुंबई विद्यापीठ अंतर्गत असलेल्या एनएसएस आणि अचिवर्स महाविद्यालयातील एनएसएस युनिट यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय जिल्हा स्तरीय आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन नुकतेच संपन्न झाले. या कार्यशाळेमध्ये ठाणे जिल्ह्यातील ३७ महाविद्यालयातील ८१ विद्यार्थी सहभागी झाले होते.
या कार्यशालेमध्ये भूपेंद्र मिश्रा (फाऊंडर, द रेसिलाइंट्स फाऊंडेशन) यांनी उपस्थित विद्यार्थांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ठाणे जिल्हा समन्वयक जीवन विचारे, अचीवर्स महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ. महेश भिवंडीकर, प्राचार्या सोफिया डिसुझा, उपप्राचार्य सना खान, एनएसएस कार्यक्रम अधिकारी राजेश यादव आणि माधुरी मुरबाडे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी एनएसएस विभागीय समन्वयक डॉ. संदेश जायभाये यांच्या हस्ते कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
Source : The News Tracks