महामार्ग पोलीस कराड यांचे वतीने मृत्युंजय दूत व नागरिकांचे प्रशिक्षण संपन्न.
महामार्ग पोलीस कराड यांचे वतीने मृत्युंजय दूत व नागरिकांचे प्रशिक्षण संपन्न. कराड - प्रतिनिधी. पोलीस उपमहासंचालक यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या अपघातग्रस्त लोकांना मदतीचा हात व प्रथमोपचार , अग्निशमन व आपत्कालीन बचाव या गोष्टींचा समावेश असलेली मृत्यूंजय दूत ही संकल्पना सर्वत्र राबवली जात आहे . सर्व मृत्यूंजय दूत व नागरिकांचे प्रशिक्षण आ.च.विद्यालय व आदर्श ज्युनियर कॉलेज मलकापूर येथे नुकतेच संपन्न झाले .हे प्रशिक्षण द रेसिलेंट फौंडेशनचे अनिकेत पाटील ,शैलेश मिश्रा, सिद्धेश काजरे यांनी विविध प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून दिले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य एस.वाय.गाडे होते. सर्वच प्रात्यक्षिके डोळ्यांची पारणे फेडणारी होती.तसेच सदरची प्रात्यक्षिके विद्यार्थी, पालक व शिक्षकांना व्यावहारीक जीवन जगताना अत्यंत उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमास सेवानिवृत्त सहा पोलिस निरीक्षक अशोक जाधव,पोलीस उपनिरीक्षक अन्वर मुजावर,सहा पोलीस निरीक्षक अतुल लोखंडे , प्रा संजय थोरात, पोलीस पाटील प्रशांत गावडे,उपमुख्याध्यापक अनिल शिर्के पर्यवेक्षिका अरुणा कुंभार, शीला पाटील, जे.…