महामार्ग पोलीस कराड यांचे वतीने मृत्युंजय दूत व नागरिकांचे प्रशिक्षण संपन्न.

महामार्ग पोलीस कराड यांचे वतीने मृत्युंजय दूत व नागरिकांचे प्रशिक्षण संपन्न.

कराड – प्रतिनिधी.

पोलीस उपमहासंचालक यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या अपघातग्रस्त लोकांना मदतीचा हात व प्रथमोपचार , अग्निशमन व आपत्कालीन बचाव या गोष्टींचा समावेश असलेली मृत्यूंजय दूत ही संकल्पना सर्वत्र राबवली जात आहे . सर्व मृत्यूंजय दूत व नागरिकांचे प्रशिक्षण आ.च.विद्यालय व आदर्श ज्युनियर कॉलेज मलकापूर येथे नुकतेच संपन्न झाले .हे प्रशिक्षण द रेसिलेंट फौंडेशनचे अनिकेत पाटील ,शैलेश मिश्रा, सिद्धेश काजरे यांनी विविध प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून दिले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य एस.वाय.गाडे होते. सर्वच प्रात्यक्षिके डोळ्यांची पारणे फेडणारी होती.तसेच सदरची प्रात्यक्षिके विद्यार्थी, पालक व शिक्षकांना व्यावहारीक जीवन जगताना अत्यंत उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमास सेवानिवृत्त सहा पोलिस निरीक्षक अशोक जाधव,पोलीस उपनिरीक्षक अन्वर मुजावर,सहा पोलीस निरीक्षक अतुल लोखंडे , प्रा संजय थोरात, पोलीस पाटील प्रशांत गावडे,उपमुख्याध्यापक अनिल शिर्के पर्यवेक्षिका अरुणा कुंभार, शीला पाटील, जे. एन. कराळे,आर.के.राठोड, संगीता कांबळे, विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी, कराड मधील महामार्ग सुरक्षा पथकाचे सर्व अंमलदार उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहा.पोलिस निरीक्षक रघुनाथ कळके यांनी केले.सूत्रसंचालन शरद तांबवेकर यांनी केले तर सर्व उपस्थितांचे आभार शीला पाटील यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *