रेसिलियन्ट फाउंडेशनचा पुढाकार एक्सप्रेस वेवर प्रथमोपचार प्रशिक्षण शिबीर

रेसिलियन्ट फाउंडेशनचा पुढाकार एक्सप्रेस वेवर प्रथमोपचार प्रशिक्षण शिबीर

Branding, News
रेसिलियन्ट फाउंडेशनचा पुढाकार एक्सप्रेस वेवर प्रथमोपचार प्रशिक्षण शिबीर         Source : नवराष्ट्र  
Read More
रेसिलियेंट फाऊंडेशनच्या माध्यमातून एक्स्प्रेस वेवर प्रथमोपचार प्रशिक्षण शिबिराचे आयोजन.

रेसिलियेंट फाऊंडेशनच्या माध्यमातून एक्स्प्रेस वेवर प्रथमोपचार प्रशिक्षण शिबिराचे आयोजन.

Branding, News
[video width="1920" height="1080" mp4="https://resilientfoundation.org/wp-content/uploads/2022/05/y2mate.com-रसलयट-फऊडशनचय-मधयमतन-एकसपरस-ववर-परथमपचर-परशकषण-शबरच-आयजन_1080p-1.mp4"][/video]   मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर होणाऱ्या अपघातात मदत करणारे पळस्पे आणि बोरघाट पोलिस विभागाचे अधिकारी व कर्मचारी, रस्त्यांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, टोल प्लाझा मधले आय. आर. बी. चे कर्मचारी व महामार्गावर दुरुस्ती काम करणाऱ्या कामगाराना रेसिलियेंट फाऊंडेशनच्या माध्यमातून गोल्डन अवर मध्ये उपचार आणि बचाव कार्य संबंधीचे धडे भूपेंद्र मिश्रा यांनी दिले. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या संसाधनातून, तंत्रशुद्धरित्या, तत्काळ आणि सहजपणे प्रथम उपचार कसे करता येतात, याबद्दल प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले. अपघातात चुकीच्या पद्धतीने जखमींना हाताळल्याने गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात हे वेगवेगळ्या पद्धतीने शिबिरार्थींना समजावून देत तसे प्रकार टाळण्याकरिता योग्य उपाय सुचविले. रेसिलियेंट फाऊंडेशने आयोजित केलेल्या शिबीराचे संदर्भात अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या गुरुनाथ साठेलकर यांनी प्रास्ताविक केले तर पोलिस वाहतूक विभागाकडून सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश परदेशी यांनी आभार व्यक्त केले. रेसिलियेंट फाऊंडेशन, महाराष्ट्र पोलीस,…
Read More
कल्याण : एक दिवसीय जिल्हा स्तरीय आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न

कल्याण : एक दिवसीय जिल्हा स्तरीय आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न

Branding, News
कल्याण : मुंबई विद्यापीठ अंतर्गत असलेल्या एनएसएस आणि अचिवर्स महाविद्यालयातील एनएसएस युनिट यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय जिल्हा स्तरीय आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन नुकतेच संपन्न झाले. या कार्यशाळेमध्ये ठाणे जिल्ह्यातील ३७ महाविद्यालयातील ८१ विद्यार्थी सहभागी झाले होते. या कार्यशालेमध्ये भूपेंद्र मिश्रा (फाऊंडर, द रेसिलाइंट्स फाऊंडेशन) यांनी उपस्थित विद्यार्थांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ठाणे जिल्हा समन्वयक जीवन विचारे, अचीवर्स महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ. महेश भिवंडीकर, प्राचार्या सोफिया डिसुझा, उपप्राचार्य सना खान, एनएसएस कार्यक्रम अधिकारी राजेश यादव आणि माधुरी मुरबाडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी एनएसएस विभागीय समन्वयक डॉ. संदेश जायभाये यांच्या हस्ते कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. Source : The News Tracks
Read More
महामार्ग पोलीस कराड यांचे वतीने मृत्युंजय दूत व नागरिकांचे प्रशिक्षण संपन्न.

महामार्ग पोलीस कराड यांचे वतीने मृत्युंजय दूत व नागरिकांचे प्रशिक्षण संपन्न.

News
महामार्ग पोलीस कराड यांचे वतीने मृत्युंजय दूत व नागरिकांचे प्रशिक्षण संपन्न. कराड - प्रतिनिधी. पोलीस उपमहासंचालक यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या अपघातग्रस्त लोकांना मदतीचा हात व प्रथमोपचार , अग्निशमन व आपत्कालीन बचाव या गोष्टींचा समावेश असलेली मृत्यूंजय दूत ही संकल्पना सर्वत्र राबवली जात आहे . सर्व मृत्यूंजय दूत व नागरिकांचे प्रशिक्षण आ.च.विद्यालय व आदर्श ज्युनियर कॉलेज मलकापूर येथे नुकतेच संपन्न झाले .हे प्रशिक्षण द रेसिलेंट फौंडेशनचे अनिकेत पाटील ,शैलेश मिश्रा, सिद्धेश काजरे यांनी विविध प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून दिले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य एस.वाय.गाडे होते. सर्वच प्रात्यक्षिके डोळ्यांची पारणे फेडणारी होती.तसेच सदरची प्रात्यक्षिके विद्यार्थी, पालक व शिक्षकांना व्यावहारीक जीवन जगताना अत्यंत उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमास सेवानिवृत्त सहा पोलिस निरीक्षक अशोक जाधव,पोलीस उपनिरीक्षक अन्वर मुजावर,सहा पोलीस निरीक्षक अतुल लोखंडे , प्रा संजय थोरात, पोलीस पाटील प्रशांत गावडे,उपमुख्याध्यापक अनिल शिर्के पर्यवेक्षिका अरुणा कुंभार, शीला पाटील, जे.…
Read More